
कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट
राहुरी तालुक्यातील कणगर येथे साधारणपणे दिड ते दोन महीन्यापासून अवैधरित्या मुरूम उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन बंद व्हावे याकरिता कनगर येथील ग्रामस्थांनी राहुरी तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मुरूम वाहणारे ढंप्पर है ओहरलोड भरून अत्यंत भरधाव वेगात वाहतुक -करीत आहेत. तेव्हा सदर गावातील विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. कारण या अगोदरही परिसरात गंभीर आपघाताच्या घटना घडल्या आहेत.
काही काळ उत्खनन बंद होते मात्र अवैध वाळू माफीयांनी पुन्हा जोमात उत्खनन सुरू केले आहे. यासंदर्भात शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत राजरोसपणे मुरूम उत्खनन कनगर परिसरात सुरू आहे. अवैधरित्या सुरू असलेल्या मुरूम उत्खननामुळे शासनाचा महसूल देखील बुडतो आहे.
यामुळे प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन कनगर परिसरातील मुरूम उत्खनन बंद करावे अशी मागणी कणगर येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांना केली आहे. निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कनगर अध्यक्ष भाऊसाहेब दिवे, ग्रामपंचायत सदस्य धनंजय बर्डे,नारायण माळी आदींच्या सह्या आहेत.