नांदेड/ प्रतिनिधी:- नुकत्याच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत त्यांचे निकाल हाती आल्यानंतर यामध्ये अनपेक्षितपणे या निवडणुकीत भाजप व महायुतीच्या उमेदवार निवडून आल्यामुळे तसेच ईव्हीएम मशीन मध्ये मोठ्या प्रमाणात गडबड झाल्याचे दिसल्या नंतर मतदान केंद्रामध्ये मतदानाची टक्केवारी कमी असताना मते मात्र जास्तीत दाखवुन ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा झाला आहे.
याविषयी लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित ईव्हीएम मशीन हटाव देश बचाव विषयी प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळुन बॉलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी दिं. २६ नोव्हेंबर २४ मे.जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर केली होती. त्या नंतर वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये प्रा.रामचंद्रजी भरांडे सर यांच्यावर पोलीसांनी अखेर गुन्हा दाखल केला आहे.
रितसर सर्व नियमानुसार लोकशाही मार्गाने आंदोलन केले असताना,आकसबुध्दीने,मनात जाणीवपूर्वक द्वेष ठेवून संघटनेचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते कारागृहात डांबून ठेवण्याची मानसिकता या जातीयवादी पक्ष व संघटनेने केल्यामुळे, भाजप,आरएसएस, आमदार,खासदार,मंत्री यांनी पोलिसांना हाताशी धरुन हा गैरप्रकार केला आहे.आम्ही येणाऱ्या काळात जातीयवादी पक्ष विरोधात अधिक तीव्रतेने या जातीवादी पक्षाची व त्यांच्या चुकीच्या भूमिका विषयी सतत संघर्ष करत राहु.
असेही शेवटी प्राध्यापक भरांडे सर म्हणाले,तुम्ही हजारो पोलीस कारवाई केल्या,तरी मी माझे काम करणे सोडणार नसल्याची सुद्धा कडवट प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.