ताज्या बातम्याराजकिय

दर्शना रमेश पंडित यांच्या रूपाने कॉग्रेसने सर्व सामान्य जनतेची समस्या सोडवणारा उमेदवार दिल्याने मतदारांमध्ये नवचैतन्य

हिमायतनगर प्रतिनिधी

हिमायतनगनगर पंचायत निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.  उच्च शिक्षित तरूण तडफदार दैनिक लोकशक्तीचे मराठवाडा विभागीय संपादक रमेश पंडित यांच्या पत्नी दर्शना रमेश पंडित या वार्ड क्रं. ७ मधून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
दर्शना रमेश पंडित यांनी जनसंवाद आणि पत्रकारिता या क्षेत्रात शिक्षण पुर्ण केले असून त्या प्रभागाचे उत्तमरित्या नेतृत्व करण्यास सक्षम असल्याचे मतदारामध्ये बोलल्या जात आहे. त्याचबरोबर त्यांची सर्वात महत्वाची बाजू म्हणजे रमेश पंडित हे एका दैनिकाचे विभागीय संपादक असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे याचे उत्तम ज्ञान त्यांना आहे. उत्कृष्ट भाषाशैली , मोठा जनसंपर्क, प्रत्येकाच्या सुख-दु:खात सदैव सहकार्य करणारा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे.

काँग्रेस पक्षाने एक उच्च शिक्षीत उमेदवार वार्ड क्रं. ७ मध्ये दिल्याने आमच्या समस्या नक्की सुटणार आहेत असेही मतदारामध्ये बोलल्या जात आहे. एकंदरीतच कॉग्रेस पक्षाने दर्शना रमेश पंडित यांच्या रूपाने सर्वसामान्य जनतेची समस्या सोडवणारा उमेदवार दिल्याने वार्ड क्रं. ७ मधील मतदारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close