कामारीचे भूमिपुत्र प्रा. संदीपकुमार मारोतराव देवराये यांना स्वारातीम विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान.

हिमायतनगर प्रतिनिधी/- तालुक्यातील मौजे कामारी येथील भूमिपुत्र संदीपकुमार मारोतराव देवराये यांना नुकतीच रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान करण्यात आली.
ग्रामीण भागातील उच्च शिक्षण घेणारे कामारी येथील रहिवाशी संदिप देवराय यांनी नुकतीच रसायनशास्त्र विषयातून एम. एस्सी., नेट, सेट व गेट परीक्षा उत्तीर्ण करून आपले पीएच.डी. पदवीसाठीचे संशोधन ‘सिंथेसिस, कॅरेक्टरायझेशन अँड फार्माकोलॉजिकल स्टडी ऑफ मेटल-चिलेट कॉम्प्लेक्सेस: फ्रॉम हेटेरोसायक्लीक शिफ बेस लिग्यांड’ या विषयावर पूर्ण केले. त्यांचे संशोधन मार्गदर्शक म्हणून माधवराव पाटील महाविद्यालय, पालम येथील सहयोगी प्राध्यापक डॉ.साईनाथ झांगडे यांचे मार्गदर्शन लाभले. दि.18 नोव्हेंबर 2025 रोजी रसायनशास्त्र संकुल, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड येथे मौखिकी संपन्न झाली व पीएचडी पदवी मिळाली.
या याबद्दल कामारी गावचे सरपंच प्रतिनिधी ऍड विजय सोनुले, उपसरपंच अशोक शिरफुले, पोस्टमास्टर मिर्झा जब्बार बेग प्रा. संतोष देवराये, जोगेंद्र नरवाडे, दिगांबर शिरफुले,गणेश देवराये, विनायकराव देवराये,
गावातील प्रतिष्ठित नागरिक सह मित्र परिवाराणी प्रा डॉ. संदिप देवराये यांना पीएच.डी.पदवी मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुंन त्यांना शुभेच्छा दिल्या



