
कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट
संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय आदेशानुसार ‘घर घर संविधान’ हा उपक्रम श्रीमती सुरेखा तांबट मॅडम, गटशिक्षणाधिकारी माणगाव यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण पद्धतीने माणगाव तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज ‘ए. के. आय. उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, गोरेगाव’ आणि ‘ना. म. जोशी विद्याभवन, गोरेगाव’ येथे संविधान गुण गौरव समितीच्या सहकार्याने लेखी स्वरूपात एक ‘संविधान गुण गौरव’ स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले.
‘घर घर संविधान’ ह्या शासन निर्णयाची आदर्श अंमलबजावणी माणगाव तालुक्यात आद. श्रीमती सुरेखा तांबट मॅडम, गटशिक्षणाधिकारी, माणगाव यांच्या नेतृत्वाखाली व त्यांनी केलेल्या नियोजनानुसार होत आहे. या संविधानावर आधारित लेखी स्पर्धा परीक्षेत ए. के. आय. उर्दू माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या तब्बल ५०० विद्यार्थ्यांनी, तर ना. म. जोशी विद्याभवन गोरेगाव येथील २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला.
अशा प्रकारच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून माणगाव तालुक्यात होणारी ‘घर घर संविधान’ ह्या शासन निर्णयाची आदर्शवत अंमलबजावणी राज्यभरात कौतुकाचा विषय ठरत आहे. तो अधिकाधिक लोकप्रिय होऊन अनुकरणीय ठरावा, यासाठी माणगाव तालुक्यातील सर्व शिक्षक, केंद्र प्रमुख व अधिकारी वर्ग मनापासून प्रयत्न करत असल्याचे आद. श्रीमती सुरेखा तांबट मॅडम, गटशिक्षणाधिकारी यांनी याप्रसंगी नमूद केले.
ए. के. आय. उर्दू शाळेतील तब्बल सहभागी झालेली ५०० विद्यार्थ्यांची संख्या ही केवळ माणगावसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असून मला आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा खुप अभिमान वाटत असल्याचे यावेळी गटशिक्षणाधिकारी मॅडमांनी गौरवोद्गार काढले. हेच ५०० विद्यार्थी ‘संविधान दूत’ बनून घरोघरी संविधान पोहोचवतील, असा विश्वास यावेळी मॅडमांनी व्यक्त केला.
गटशिक्षणाधिकारी मॅडमांनी व्यक्त केलेल्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचा निश्चित प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ए. के. आय. हायस्कूलचे प्राचार्य आद. मूनीर सरांनी आश्र्वासित केले. ‘घर घर संविधान’ ह्या उपक्रमाची आदर्शवत अंमलबजावणी सदर उर्दू हायस्कूल मध्ये होत असल्याचे समाधान शिक्षण विस्तार अधिकारी आद. खामकर सरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
संविधान हे केवळ एक कायद्याची जंत्री नसून प्रत्येक भारतीय नागरिकांच्या सन्मानजनक तथा प्रतिष्ठपूर्वक जीवन जगण्याचा आधार असल्याचे सांगत संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण यांनी आपल्या मनोगतातून संविधानाचे महत्व विषद केले.
याप्रसंगी श्रीमती सुरेखा तांबट मॅडम गटशिक्षणाधिकारी माणगाव, शिक्षण विस्तार अधिकारी खामकर सर, मुख्या. मूनीर सर, संविधान प्रचारक नुरखॉं पठाण, नदीम भाई, इस्माईल परदेशी, मोहसिन सर, सलीम सर, ए. के. आय. उर्दू हायस्कूलचे सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर दुपार सत्रात ना. म. जोशी विद्याभवन, गोरेगाव येथे झालेल्या संविधान गुण गौरव परीक्षेदरम्यान मुख्या. शहा सर, पर्यवेक्षक आद. खैरे मॅडम, खामकर मॅडम, सुरेश कांबळे सर, सचिन गोरेगावकर सर, तसेच अनेक शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.