कार्यकारी संपादक जालिंदर आल्हाट
राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात २२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर तरुणाची आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.
कणगर येथील राजवाडा परिसरात राहणारा अनिकेत संजय दिवे हा गेल्या चार ते पाच दिवसापासून राहत्या घरातून बेपत्ता होता याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी राहुरी पोलिसांत दिलेल्या खबरीवरून मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान आज कणगर नजीक असलेल्या खडीक्रेशरजवळ भारतळी येथे फॉरेस्टच्या हाद्दीत बेपत्ता अजिंक्य दिवे याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सह पथकाने धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. दरम्यान अनिकेत दिवे याची आत्महत्या की घातपात याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही.