
नांदेड/प्रतिनिधी :-
परभणी येथे महामानव,परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधान प्रतिकृती शिल्पाची विटंबना झाल्यानंतर तेथे झालेल्या लाठी हल्यात आंदोलक तथा संविधान रक्षण मयत अँड सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी वय ३५ वर्ष या युवकाचा पोलीस कोठडीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तसेच नायगाव बा.येथील मातंग समाजाचा होतकरु तरुण तथा ड्रायव्हर आनंदा डोईवाड यांची तब्येत बिघडल्याने नांदेड शहरातील निर्मल या खाजगी दवाखान्यात ईलाज करण्यासाठी ऍडमिट केल्यानंतर त्यांच्यावर चुकीचे उपचार व ऑपरेशन करत असताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका नव तरुणाचा जीव गेल्याने अख्खे कुटुंब रस्त्यावर आलेआहे. दोषी संबंधित डॉक्टरांची खातेनिहाय चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केलेले आहे. दुसऱ्या एका प्रकरणात मौजे सावरगाव-ईस्लापूर ता.किनवट येथील समाजाचा तरुण मयत नामे सखाराम मारोती गायकवाड यांचा आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरून तिष्ण हत्यारांने व दगडाने निर्घुणपणे खून करण्यात आला आहे.
त्या खून करणाऱ्या आरोपीला अद्याप ईस्लापूर पोलिसांनी पकडले नसुन या प्रकरणाची तातडीने जिल्हा पोलीस प्रशासनाने सविस्तर गोपनीयपणे चौकशी करुन आरोपीला तात्काळ अटक करावी.त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात यावी अशा पद्धतीचे निवेदन लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र संस्थापक/अध्यक्ष प्रा. रामचंद्रजी भरांडे सर यांच्या नेतृत्वाखाली अभिजीत राऊत जिल्हाधिकारी नांदेड व शहाजी उमाप विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड यांना देण्यात आले.
सदरील निवेदन १६ डिसेंबर २०२४ रोजी देण्यात आले. परभणी येथे आंदोलक तथा संविधान रक्षण मयत सोमनाथ व्यंकटी सुर्यवंशी या आंदोलकाला जबर गंभीरपणे मारहाण झाली होती. सोमनाथ सुर्यवंशी हा विधी शाखेचा विद्यार्थी होता. पोलीसांच्या थर्ड डिग्री मारहाणीमुळेच त्याचा कोठडीत मृत्यु झाला आहे.
तर काही महिला आंदोलकांचे डोके फुटले आहेत. महिलांच्या हातापायाला फक्चर झाले आहे. परभणी पोलीसांच्या पाश्वी मानसिकतेच्या विरुध्द दि.१६ डिसेंबर रोजी नांदेड बंदचे आवाहन करण्यात आले होते.
परभणी येथे दलित वस्तीमध्ये कोंबींगऑपरेशनच्या नावाखाली गस्त घालणार्या पोलिसांना थांबविले पाहिजे.
नांदेड शहरातील निर्मल खाजगी दवाखान्यात ईलाज करण्यासाठी ऍडमिट केल्यानंतर त्यांच्यावर चुकीचे उपचार व शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी जाणीवपूर्वक निष्काळजीपणे व हलगर्जीपणामुळे मयत आनंदा डोईवाड यांचा जीव घेतलेला आहे.त्या मयताची चौकशी होऊन तात्काळ दोषी डॉक्टरांवर गुन्हे नोंदवून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यात यावी.
मौजे सावरगाव -ईस्लापूर ता.किनवट येथील मयत तरुण सखाराम मारोती गायकवाड यांच्या खुनाची जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने गंभीर पूर्वक नोंद घेऊन सर्व आरोपीला ताबडतोब अटक करण्यात येऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी.अन्यथा येणाऱ्या काळात लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने जिल्हा कचेरीवर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल.
असा ही इशारा यावेळी निवेदनात देण्यात आला आहे.या निवेदनावर माजी पोलीस कर्मचारी डी.के.मोरे खैरकेकर, संजय खानजोडे, धोंडोपंत बनसोडे,दिगांबर गायकवाड, राजु शेळके यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.