उमरखेड (दि. 11 जानेवारी) एसटी आगारात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रमोदिनी किनाके हे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कैलास भगत (सहाय्यक पोलीस निरीक्षक), पत्रकार सिद्धार्थ दिवेकर (सह संपादक महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल), डॉ. सचिन वानखेडे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करूत रिबेन कापून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या वतीने एपीआय कैलास भगत यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाबद्दल वाहन हे दक्षतापूर्वक व्यसन न करता मोबाईलचा वापर चालकांनी ड्रायव्हिंग करताना करू नये अशा प्रकारे मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षा प्रमोधिनी किनके मॅडम यांनी आपल्या आगारातील वाहक चालक आणि मेकॅनिकल यांना अमूल्य मार्गदर्शन केले. यावेळीश्री मनवर सहाय्यक वाहतूक अधीक्षक, श्री भदाडे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, श्री उगले वाहतूक निरीक्षक, चंद्रकांत आष्टुरकर लिपिक, सौ पाटील मॅडम वरिष्ठ लिपिक, नविद लिपिक यांत्रिक, चालक वाहक हजर होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम कागणे यांनी केले तर आभार एम एस शिरलू यांनी केले.